संगमनेर – मांडवे बुद्रुक येथील लिंब फाटा अंधारात, कारण…..

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील लिंब फाट्यावर चौकात बसवलेला हायमास्ट गेली काही दिवसांपासून बंद असल्याने तो लवकरात लवकर चालू करण्याची मागणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मात्र याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे समोर आले आहे.

अधिक माहिती अशी की, मांडवे बुद्रुक हद्दीतील लिंब फाट्यावर गेल्या अनेक दिवसांपूर्वी चौकातील मधोमध हायमास्ट बसविण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हायमास्ट बंद पडला आहे. लिंब फाटा हा मुख्य चौक असून या ठिकाणाहून लोणी, पारनेर, संगमनेर कडे दिवसरात्र मोठ्या प्रमाणात प्रवासी ये जा करत असतात. तसेच या चौकाच्या आसपास काही व्यावसायिकांची दूकाने देखील आहे.

तसेच इथे बसथांबा देखील असल्याने रात्रीच्या वेळी या ठिकाणी प्रवासी थांबत असतात. त्यामुळे या चौकात प्रकाश असणे गरजेचे आहे. मात्र जो हायमास्ट आहे तोच बंद झाल्याने लिंब फाटाच अंधारात गेला आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले गेले असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे हा हायमास्ट अडचण नसून खोळंबा बनला आहे. उलट या ठिकाणी अंधारात अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने हायमास्ट चालू करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment