राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के ; यंदाही मुलींनी मारली बाजी

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक गेल्या अनेक दिवसांपासून या निकालाच्या प्रतीक्षेत होते. बारावीचा निकाल लागल्यानंतर आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाचे अपडेट्स दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे, तर मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारीही यंदा जास्त आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर आणि अन्य वेबसाईटवर १० वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा निकाल पाहता येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे गुण दिसतील. विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका शाळेतून मिळेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.

दहावीचा निकाल ९२.०९ टक्के

बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाबाबतची माहिती दिली. राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के इतका लागला आहे. 12वी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील २ टक्क्यांनी घसरला आहे. यामध्ये कोकण विभागाने निकालात सर्वात अव्वल क्रमांक पटकावला आहे, कोकण विभागाचा ९७.६२ टक्के लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे, अशी माहिती त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे.

परीक्षेचे निकाल लवकर जाहीर व्हावेत यासाठी दहावीची परीक्षा 10 दिवस लवकर आयोजित केली होती. राज्य मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती देखील करण्यात आली होती. ९ विभागीय मंडळात हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. या वर्षी 92.9 टक्के निकाल लागला आहे.

यंदाही मुली ठरल्या अव्वल

जेवढ्या मुली बसल्या होत्या त्यापैकी 94.96 टक्के मुली या उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्याबाबत ती 89.56 टक्के आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही मुली अव्वल ठरल्या आहेत. यावेळी मुलींनी बाजी मारली आहे. दोघांमध्ये 5 टक्क्यांचा फरक हा पास होण्यामधला आहे. एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली होती. त्यापैकी 20 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे.

कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल

पुणे – ९४.२४ टक्के

नागपूर- ८९.०७ टक्के

संभाजीनगर- ८८.४१

मुंबई – ९४.९७

कोल्हापूर – ९५.४७

अमरावती – ९०.५०

नाशिक ९०.५३

लातूर – ८८.४२

कोकण – ९७.६२

Leave a Comment