संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूरसह परिसरात सोमवारी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता, तर वातावरणीय बदल झाल्याने वादळी वारा आणि मेघगर्जनेसह परिसरात तुफान पाऊस झाला.
साकूर, बिरेवाडी, मांडवे बुद्रुक, शिंदोडी, जांभुळवाडी, कौठेमलकापूर, चिंचेवाडी, हिवरगाव पठारसह आदि गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
यादरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ देखील झाल्याची पाहायला मिळाली. पाऊस कोसळल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय.
