जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्व सामान्यांना गुड न्यूज मिळाली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात केली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात २४ रूपयांनी कपात झाली आहे, नवे दर आजपासून लागू होणार आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात अथवा वाढ करण्यात आलेली नाही. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून थोडासा दिलासा मिळाला आहे.
तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात केली आहे. नवे दर आजपासून (१ जून) लागू झाले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) नुसार, दिल्लीत १९ किलोग्रॅमचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता १,७२३.५० रुपये (पूर्वी १,७४७.५० रुपये), कोलकात्यात १,८२६ रुपये (पूर्वी १,८५१.५० रुपये), मुंबईत १,६७४.५० रुपये (पूर्वी १,६९९ रुपये) आणि चेन्नईत १,८८१ रुपये (पूर्वी १,९०६ रुपये) मध्ये उपलब्ध असेल. या कपातीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांना दिलासा मिळाला आहे.
