संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागातून एक दुःखद बातमी समोर आलीय. दोन मित्रांचा जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
सुनिल पांडुरंग भूतांबरे (वय १८ ) व किरण पाराजी गावडे ( वय २०) रा. कौठेमलकापूर ता. संगमनेर असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणांचे नाव आहे.
आळेफाटा काही तरी कामानिमित्त सुनिल व किरण हे दोघे मित्र गेले होते. आळेफाटा येथेच त्यांचा अपघात झाला. या अपघातात दोन जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
