महाराष्ट्राच्या राजकारणात पून्हा मोठा राजकीय भूकंप, ठाकरे गटाचे ५ खासदार……

महाराष्ट्राच्या राजकारणात पून्हा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. ठाकरे गटाचे 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रात लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे.

पक्षात सुरु असलेली आऊट गोईंग थांबवण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला आणखी एका खासदाराची गरज आहे. एक खासदारांशी देखील संपर्क सुरू आहे. दरम्यान यापूर्वी देखील शिवसेना UBTचे 6 खासदार संपर्कात असून लवकरच मोठे प्रवेश होणार असल्याचा दावा उदय सामंतांनी केला होता.

सुधाकर बडगुजर भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच… सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षाविरोधी कृतीमुळे सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय.. मंगळवारी बडगुजर यांनी पक्षाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसंच पक्षात आठ ते दहा जण नाराज असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं. दरम्यान त्यांच्या याच वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवलाय.

उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर नाव सांगणार नाही अशी शपथच आता शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदमांनी घेतलीये. दोपाली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेनं ऑपरेशन टायगर फत्ते केलंय. ठाकरेंच्या 9 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली. या पक्षप्रवेशादरम्यान रामदास कदमांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. तर रामदास कदम यांना पुन्हा मातोश्रीच्या दारात यावंच लागणार, असा दावाच राऊतांनी केलाय.

Leave a Comment