मुंबई – अकोले विधानसभा मतदारसंघातील जलसंपदा विभागातील विकासकामे आणि संगमनेर तालुक्यातील साकुर व पठार भागातील जलनियोजन संदर्भात आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. तसेच या बैठकीत आढावा घेण्यात आला.
या बैठकीत प्रामुख्याने मेळावणे बंधारा, बिताका पाणी वळण बंधारा, भंडारदरा, शिळवंडी, बलठण, पाडोशी बुडीत बंधारे बांधणे, निमगाव भोजापूर धरणाचे पाणी नियोजन, साकूर पठार भागातील मोरवाडी धरणासह या भागातील पाणी प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करून याबाबतचे अहवाल सर्व्हेक्षण करून ताताडीने सादर करण्याच्या सूचना ना. विखेंनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीस आ.डॉ. किरण लहामटे, आ.अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. दिपक कपूर, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. संतोष तिरमनवार मुख्य अभियंता तथा सहसचिव संजीव टाटू यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
