अरेरे! चोरट्यांना म्हणाव तरी काय, साकूरमध्ये चोरांनी भलतंच चोरल…

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) शेतातील बांधावर लावलेली केशर जातीचे आंब्याची रोपे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना संगमनेर तालुक्यातील साकूर येथील मांगमळई येथे तीन दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेबाबत नानासाहेब जनार्दन आमले यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घारगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नानासाहेब आमले यांनी तक्रारीत म्हटले आहे की, साकूर शिवारातील मांगमळई येथे कुंटुबांसह एकत्र राहतो व शेती व्यवसाय करुन कुंटुबांचा उदरनिर्वाह करतो. तसेच माझ्या शेत गट नं 132/3 चे शेतातील बांधावर दिनांक 21 जून 2025 रोजी केशर जातीचे आंब्याची रोपे लावलेली होती.

त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी 9/30 वा. चे सुमारास आंब्याचे रोपांना पाणी देण्यासाठी गेलो असतो. मात्र मला मी लावलेले ठिकाणी आंब्याची रोपे दिसली नाही. मी आजुबाजुला पाहीले असता मला माझी आंब्याचे रोपे दिसुन आली नाही. सदर आंब्याची 12 रोपे ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःचे फायदयाकरिता चोरुन नेली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Comment