संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील स्व.सिराजभाई शेख यांचं सहा वर्षांपूर्वी दुःखद निधन झाले. आज त्यांचा सहावा स्मृतीदिन. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची त्यावेळी ओळख होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मुलगा रऊफ शेख यांनी सर्वच क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वडीलांच्या आज सहाव्या स्मृतीदिनानिमित्त आठवणींने रऊफ शेख हळहळून गेल्याच बघायला मिळाले. रऊफ शेख यांनी वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट टाकत भावना व्यक्त केल्या आहेत.
नेमकं काय म्हटलंय पोस्टमध्ये वाचा जशीच्या तशी
माझे सामाजिक व राजकीय गुरु,ज्यांनी मला समाजात ताठ मानेने उभे केले असे माझे वडील स्व.सिराजभाई शेख यांचा आज 6 वा स्मृतीदिन! खरंतर माझे वडील जर नसते तर कदाचित मी कधी राजकारणातही आलो नसतो,कुठेतरी फक्त नोकरी करत असतो.पण वडिलांनी मला अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकवले आणि माझा समाजकारणातुन राजकारणात प्रवेश झाला.ते दिवस मला आजही आठवतात,जेव्हा मी सभेत भाषण करायचो आणि वडिलांचे सहकारी त्यांना येऊन भेटायचे आणि तुमचा मुलगा फार छान बोलला असे म्हणायचे तेव्हा त्यांचे डोळे भरुन आलेले असायचे.
माजी मंत्री स्व.मधुकरराव पिचड साहेब व नंतर लोकनेते स्व.बाळासाहेब विखे पा.या दोघांचेही ते निकटवर्तीय राहिले,पण त्यांनी या संबंधाचा वापर कधीच वैयक्तिक स्वार्थासाठी केला नाही.अगदी सामान्यपणे ते जगले.आजकाल नेत्यांच्या जवळ असणारी मंडळी आपला फायदा कसा होईल याला प्राधान्य देतात,परंतु निस्वार्थी राजकारण कसे करावे याचा आदर्श वडिलांनी मला घालुन दिला.मंत्रालयात ही पहिले पाऊल मी वडिलांबरोबरच ठेवले.आयुष्यात पहिल्यांदा मंत्र्यांच्या बंगल्यावर गेलो असेल तर ते ही वडिलांबरोबरच!अशा अनेक आठवणी आहेत.
2019 साली एका शस्त्रक्रियेनंतर वाढलेल्या गुंतागुंतीत त्यांचे दुखद निधन झाले आणि त्यांचा सहवास लवकरच संपला.आज वडील नसले तरी त्यांचे विचार व आठवणी सदैव माझ्या सोबत आहेत!
विनम्र अभिवादन!
अल्लाह उन्हें मगफिरत कर जन्नत अता फरमाए! आमीन
– रऊफ शेख #25 जुन
