आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

 

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

कर्क : वाहने जपून चालवावीत. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

 

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल उत्तम राहील.

 

तुळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

धनु : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

मकर : मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

 

कुंभ : बौद्धिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

मीन : कामानिमित्त प्रवास होतील. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Leave a Comment