नगर हादरले! “या” विद्यालयात विद्यार्थ्याचा खून

अहिल्यानगर – शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सिताराम सारडा विद्यालय परिसरात विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने दुसर्‍या विद्यार्थ्याने खून  केल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली. अफान मुस्तकीर शेख असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचा खून करणारा विद्यार्थी त्याच विद्यालयात शिक्षण घेत असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्या दोन विद्यार्थ्यांमध्ये यापूर्वी वाद झाले असल्याची माहिती आहे. बुधवारी दुपारी ते दोघे विद्यालयात असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला. काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि एकाने दुसर्‍यावर शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अफान शेख याला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

घटनेची माहिती मिळाताच शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खूनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून परिसरात तणावपूर्व शांतता आहे

Leave a Comment