उपसरपंच सुभाष डोंगरे शिंदे गटाच्या वाटेवर.. आमदार अमोल खताळ यांची घेतली भेट

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागातून एक राजकीय खळबळ उडवून देणारी बातमी समोर आलीय. कॉंग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते तसेच जांबुत येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी आमदार अमोल खताळ यांची अचानक भेट घेतली आहे. संगमनेर येथील आमदार अमोल खताळ यांच्या निवासस्थानी सुभाष डोंगरे यांनी भेट घेतली.

दरम्यान या भेटीत काय चर्चा झाली? नेमकी भेट का घेतली? भेटीमागच कारण काय? याबाबत माहिती समोर आली नाही. तसेच उपसरपंच सुभाष डोंगरे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जात आहे. मात्र डोंगरे यांनी शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांची भेट घेतल्याने पठार भागात चर्चांना उधाण आले आहे. तसेच डोंगरे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment