संगमनेर(DSNews24/किरण पुरी) ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…चला पाहू रे सोहळा पंढरीचा.. महाराष्ट्रातून लाखो वारकरी, भक्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले आहे. एकादशी वारकऱ्यांसाठी सण असतो. विठ्ठल दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूर मध्ये पोहचले आहेत. तसेच राज्यभरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे देखील खास अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. कारण गेल्या वर्षभरापासून दर महिन्याच्या पहिल्या एकादशीला प्रवचनाचा कार्यक्रम घेण्यात येतो. विशेषतः प्रत्येक प्रवचनाचे सौजन्य मुस्लिम बांधव भिकन बाबुलाल शेख हे करत असतात. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. तसेच दर कार्यक्रमाला सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक,राजकीय अशा विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी बद्दल मान्यवरांचा गुणगौरव केला जातो.
मात्र आज आषाढी एकादशी निमित्ताने ग्रामस्थांनी गावात खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परिसरातील भाविकांना विठुरायाच दर्शन व्हाव यासाठी खास विठ्ठल रखुमाईच्या मुर्तीची दर्शनासाठी सोय करण्यात आली आहे.या खास सोहळ्यानिमित्त मांडवे बुद्रुक मध्ये अवघी पंढरी अवतरणार आहे. तसेच प्रत्यक्ष विठुरायाच दर्शन देखील होणार आहे.तसेच सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प घुले बाबा यांचं जाहीर हरिकर्तन होणार आहे.व तदनंतर महाप्रसादाचे आयोजन होणार आहे.
गेल्या वर्षभरापासून गावात दर महिन्याच्या पहिल्या एकादशीला प्रवचनाचा कार्यक्रम थोरात कारखान्याचे संचालक प्रा.रामदास धुळगंड सर व ह.भ.प दत्तात्रय धोंगडे गुरू यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व ग्रामस्था च्या सहकार्याने हा उपक्रम करण्यासाठी परिसरातील भाविक एकत्र येत असल्याने या खास उपक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे.
