कर्नाटक निवडणूकांसाठी महाराष्ट्रातील भाजपचे ‘हे’ बडे नेते स्टार प्रचारक

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. येथे 10 मे रोजी येथे मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच राजकारण ढवळून निघत आहे.

सत्ताधारी भाजपने तिकीट कापल्याने माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्र्यांपासून ते विद्यमान आणि माजी आमदारांपर्यंत अनेकांनी भाजपला ‘जय श्रीराम’ ठोकला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश नेते काँग्रेसच्या वाटेवर दिसत आहेत. गेल्या आठवडा भरात तब्बल आठहून अधिक बड्या राजकीय चेहऱ्यांनी भाजपची साथ सोडली आहे.

मात्र, कुठल्याही परिस्थितीत भाजपला पुन्हा एकदा कर्नाटकचा गड जिंकायचा आहे. कारण, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच काँग्रेस ४० स्टार प्रचारक कर्नाटकच्या मैदानात उतरवले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गज नेते व मंत्री कर्नाटकमध्ये प्रचारासाठी सभा घेणार आहेत.

त्यामध्ये, महाराष्ट्रातील दोन बड्या भाजप नेत्यांचा समावेश आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही नावे भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी स्टार प्रचारकांच्या नावांची यादी ट्विटरवरुन शेअर केली आहे. त्यामध्ये, ४० जणांची नावे असून महाराष्ट्रातून नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे दोन नेते आहेत.

Leave a Comment