बिग ब्रेकिंग! बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार, निकाल कुठे पाहता येणार?

इयत्ता बारावीचा निकाल (Maharashtra HSC Result 2026) उद्या (2 मे) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. 2 मे रोजी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून घेण्यात आलेल्या बारावी (HSC) परीक्षेचा 2026 चा निकाल 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. विद्यार्थी आपला निकाल mahresult.nic.in, mahahsscboard.in तसेच इतर अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother’s Name) टाकणे आवश्यक असते.

निकाल कुठे पाहता येणार?

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

https://hscresult.mkcl.org

महविद्यालयात निकालाची प्रत मिळणार-

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in महाविद्यालयांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

गुणांची गुणपडताळणी ऑनलाईन पध्दतीने करताना करणार- 

ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी रविवार दिनांक 03/05/2026 से रविवार दिनांक 17/05/2026 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्द‌तीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल. फेब्रुवारी-मार्च 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्‌तीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्याथ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

यंदा सुमारे 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा-

यंदा सुमारे 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका डाउनलोड करता येईल तसेच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ती महत्त्वाची ठरणार आहे

Leave a Comment