पारनेर – रविंद्र राजदेव यांचं थेट बीडीओला निवेदन, केली ‘ही’ मागणी

पारनेर(DSNews24 /किरण पुरी) गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्यातील विविध प्रश्नांवर निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रविंद्र राजदेव लक्ष वेधून घेत आहे. नुकतेच पेमदऱ्यातील कला केंद्राविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे रविंद्र राजदेव चांगलेच चर्चेत आले असून त्यांनी पुन्हा पारनेर तालुक्यातील तांडा सुधार योजने संदर्भात लक्ष वेधले आहे. याबाबतचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दयानंद पवार यांना दिले आहे.

तसेच पारनेर तालुक्यातील विविध गावांमधून ग्रामपंचायतीने तांडा वस्ती सुधार योजनेसाठी प्रस्ताव पंचायत समितीस सादर केले आहेत. जवळपास आठ महिने उलटून गेले तरी देखील सदर प्रस्तावावर कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. तरी सदर प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे अशी मागणी रविंद्र राजदेव यांनी केली आहे.

Leave a Comment