संगमनेरमध्ये रविवारी महामेळावा, जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी केले “हे” आवाहन 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) विधानसभा निवडणुकीत जायंट किलर आमदार अमोल खताळ यांनी विजयश्री खेचुन आणत संगमनेरमध्ये 40 वर्षानंतर ऐतिहासिक परिवर्तन केले तसेच संगमनेर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना व महायुतीचा झेंडा फडकला. या ऐतिहासिक परिवर्तनाबद्दल संगमनेरच्या जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे रविवार दि.24 ऑगस्ट रोजी संगमनेर शहरात येत आहेत. यावेळी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, पर्यटनमंत्री ना. शंभुराज देसाई, मा खा.सुजयदादा विखे पाटील उपस्थित राहणार आहे. यानिमित्ताने आभार सभेचे आयोजन शहरातील जाणता राजा मैदानावर दुपारी 4 वा.करण्यात आले आहे.

महायुतीच्या या महाविजय मेळाव्याची जय्यत तयारी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडुन सुरु असुन संगमनेर शहरात उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे हे या विजयानंतर संगमनेर शहरात प्रथमच येत असुन त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. जाणता राजा मैदानावर पार पडणार्‍या या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी केले आहे.

Leave a Comment