मेष : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
सिंह : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. आत्मविश्वास वाढेल.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तूळ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक : राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
मीन : हितशत्रूंचा त्रास संभवतो. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
