काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना, तथाकथीत कीर्तनकार संगामबापू भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनी आम्हाला नथूरामजी गोडसे व्हावे लागेल असे म्हटले होते. यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. काँग्रेसकडून या वक्तव्यावरून जोरदार टीका करण्यात आली होती. तर थोरात यांच्या समर्थनार्थ संगमनेर येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
यानंतर आता पुन्हा एकदा संग्रामबापू भंडारे यांनी थोरात यांना डिवचले आहे. त्यांनी थोरातांच्या समर्थनानंतर आळंदीमधील महाराजांच्या गाड्या फोडण्याची भाषा आता काही लोक करू लागले असल्याचा आरोप केला आहे. तर आपली गाडी फोडायची तर फोडा, पण इतर धर्म प्रचारकांवर हल्ला करू नका. आणि जर तसा हल्ला केलाच तर मला संग्रामबापूमधील बापू शब्द काढून फक्त संग्राम भंडारे व्हावे लागेल असा इशारा दिला आहे. सध्या याचा एक व्हिडिओ समोर येत असून यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर थोरातही विविध कीर्तन कार्यक्रमांना जात होते. त्यांनी संग्रामबापू भंडारे यांचा भांडा फोड करणारा लाव रे तो व्हिडिओही समोर आणला होता. ज्यानंतर हे प्रकरण आणखी तापले आहे.
आता भंडारे यांचा पुन्हा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्याच त्यांनी, थोरात यांच्या समर्थकांचा व्हिडीओही पुढे आणला आहे. ज्यात बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. त्यानंतर आळंदी मधील महाराजांच्या गाड्या फोडण्याची भाषा लोक करत असल्याचा दावा भंडारे यांनी केला आहे.
तसेच त्यांनी आपल्या या व्हिडिओत माझी गाडी फोडायची तर फोडा. पण इतर धर्म प्रचारकावर हल्ला करू नका अशे आवाहन केले आहे. तसेच या आवाहनाबरोबरच त्यांनी कुठल्याही धर्म प्रचारकावर हल्ला झाल्यास आपल्याला आपल्या नावातील बापू शब्द काढाला लागेल. आणि फक्त संग्राम भंडारे व्हावे लागेल असा इशारा दिला आहे.
