मेष – तुमचे मन स्थिर होईल. तुमचा विचार पटवून देण्याचा प्रयत्न करा. हट्ट धरू नका.
वृषभ – काम करण्यास क्षुल्लक अडचण येईल. मन अस्थिर झाल्याने कामात गोंधळ होऊ शकतो.
मिथुन – तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. पदाधिकार मिळण्याची शक्यता वाढेल.
कर्क – कठीण काम करून घ्या. नोकरी लागेल. तुमचा प्रभाव, लोकप्रियता वाढेल.
सिंह – कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करता येईल. अरेरावी करू नका. ऐकून घ्या.
कन्या – कायद्याच्या बाबतीत सावध रहा. भांडण वाढवू नका. दगदग होईल. तब्येतीची काळजी घ्या.
तूळ – सर्वांच्या मनाचा विचार करून निर्णय घेता येईल. धंद्यात फायदा होईल. ठरविलेले काम कराल.
वृश्चिक – विरोधाला सौम्य भाषेत उत्तर द्या. धंद्यात नोकर माणसे कमी होतील. गोड बोला.
धनु – अपेक्षित व्यक्ती भेटेल. तुमचा उत्साह वाढेल. महत्त्वाची वस्तू वेळीच जागेवर ठेवा.
मकर – कामाचा वेग वाढवा. पुढची योजना तयार करा. धंद्यात मागे राहू नका.
कुंभ – तुमच्या बोलण्याला चांगला प्रतिसाद मिळेल. तरीही काही लोक कुरबुर करतील. युक्ती वापरा.
मीन – तुमचा अंदाज बरोबर येईल. कठीण काम करून घ्या. चर्चा व भेट सफल होईल.
