केरळमध्ये शंकराचार्य जयंतीनिमित्त महामेळावा ; नारायण गोसावी करणार विशेष मार्गदर्शन

दिल्ली (DSNews24/किरण पुरी) आदि गुरू शंकराचार्य जयंतीनिमित्त अखिल भारतीय दशनाम गोस्वामी राष्ट्रीय कार्यकारिणीने कलाडी, जिल्हा – एर्नाकुलम, केरळ येथे संपूर्ण भारतातील आणि नेपाळमधील समाज बांधवांचा २५ एप्रिल रोजी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

तसेच शंकराचार्य जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी व्यापक तयारी सुरू केली आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन केले आहे. शंकराचार्य जयंतीला देशभरातील संत सहभागी होणार आहेत.

दरम्यान, अखिल भारतीय दशनाम गोस्वामी राष्ट्रीय कार्यकारिणीवर कायदेविषयक सल्लागार म्हणून महाराष्ट्रातील सेवानिवृत्त न्यायाधीश नारायण गोसावी आहे. या महामेळाव्यास नारायण गोसावी मार्गदर्शन करणार असून २४ एप्रिल रोजी ऐतिहासिक महामेळाव्यासाठी ते विमानाने केरळकडे प्रस्थान करणार आहे. तसेच देश पातळीवरील विविध विषयांवर चर्चा देखील करणार आहे.

महाराष्ट्रातील गोसावी समाजाचे नारायण गोसावी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे सेवा निवृत्त न्यायमूर्ती आहे.‌ समाजातील असंख्य बांधवांना कायदेशीर सल्ला देऊन मोलाच कार्य करत आहे.

तसेच राज्य, देश पातळीवर देखील ते मार्गदर्शन करत आहे. केरळ राज्यात २५ एप्रिल रोजी होत असलेल्या महामेळाव्यास देशभरातून येणाऱ्या समाजबांधवांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Comment