संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील खंडेरायवाडी परिसरात आज दोन मोटारसायकलचा भिषण अपघात झाला. या अपघातात कोल्हेवाडी येथील दादासाहेब कोल्हे यांचा मृत्यु झाला असुन खरशिंदे योगेश संजय बर्डे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने संगमनेर शहरातील कुटे हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. या अपघाताची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी तातडीने आपले सहकारी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख व ॲड.अमित धुळगंड यांना अपघातग्रस्त रुग्णाच्या मदतीसाठी रुग्णालयात पाठविले.
यावेळी रऊफ शेख व अमित धुळगंड यांनी जखमी योगेश बर्डे यांची तातडीने कुटे रूग्णालयात धाव घेत परिस्थिती जाणून घेतली. तसेच तत्काळ आवश्यक ते सहकार्य करत बर्डेची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविले असून पुढील उपचार सुरू आहे.
दरम्यान योगेश बर्डे हे आपल्या मुलीचा वाढदिवस असल्याने तिच्यासाठी केक घेऊन सारोळे पठार येथे शिकत असलेल्या शाळेत जात असल्याची माहिती समजते.
