आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृषभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने जपून चालवावीत.

 

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील.

 

सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

 

तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृश्‍चिक : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

 

धनू : हितशत्रूंचा त्रास संभवतो. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

मकर : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.

 

कुंभ : आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

 

मीन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. व्यवसायात वाढ होईल.

Leave a Comment