साकूर आश्रमशाळेत फुलांची उधळण अन् डोळ्यात अश्रूंचा पूर, पोपट गोसावी सेवानिवृत्त…

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या तीस वर्षांपासून आदिवासी विभागातील आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा देणाऱ्या पोपट हिरागिर गोसावी यांचा सेवापूर्ती सोहळा संगमनेर तालुक्यातील साकूर येथील शासकीय आश्रमशाळेत भावूक वातावरणात पार पडला. अत्यंत प्रामाणिक, सच्चा शिक्षक, कुठलाही मी पना नसलेले पोपट गोसावी यांच्यावर अक्षरशः फुलांची उधळण करत त्यांना निरोप दिलाय. यावेळी पोपट गोसावी यांच्या डोळ्यात अश्रू बघायला मिळाले.

सेवापुर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माध्यमिकचे मुख्याध्यापक शिवराज कदम होते. व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून राजूर प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोज पैठणकर हे होते तर प्राथमिक मुख्याध्यापक सुनिल खेडकर, अधिक्षक राकेश गायकवाड, संपतराव लेंडे, लता तांबे, सुनिता हासे, कल्पना जाधवर, रेवती तिखे, आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सोहळ्याच्या ठिकाणी एन्ट्री करताना पोपट गोसावी व पत्नी नंदा गोसावी यांच्यावर विद्यार्थ्यांनी फुलांची उधळण केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकदम सुन्न वातावरण बघायला मिळाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करत सरस्वतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या सोहळ्याचा प्रारंभ विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाला.

पोपट गोसावी यांची कारकीर्द कशी गेली हा संपूर्ण जीवन परिचय युवराज काळे यांनी यावेळी मांडला. त्यानंतर पोपट गोसावी व नंदा गोसावी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोज पैठणकर म्हणाले की, अत्यंत अडचणींच्या काळात पोपट गोसावी यांनी दुर्गम भागात उत्कृष्ट काम केले. तीस वर्षांच्या काळात त्यांच्या हातून तीस पिढ्या घडल्या. आदिवासी विकास विभागाला त्यांच्या सारख्या शिक्षकांची गरज आहे. आदिवासी विभाग सध्या अडचणीत आहे. एक एक शिक्षक कमी होत चालला आहे. भरती होत नाही. मात्र पोपट गोसावी याचं काम वाखण्याजोग असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

दरम्यान तीस वर्षांपासून पोपट गोसावी यांनी अनेक शासकीय आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी हा त्यांचा आवडता विषय होता. शिकविण्याची पद्धत देखील वेगळीच होती. अत्यंत प्रामाणिक व साधेपणाने आपली सेवा दिली. अक्षरशः मी शिक्षक आहे असं न समजता हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करण्याच काम केले. त्यांची ही कृतीच चर्चेचा विषय ठरली.

यावेळी पोपट गोसावी यांनी निरोपाच मनोगत व्यक्त करताना आयुष्यातील अडचणी सांगितल्या. तसेच आई वडीलांना कधीच विसरू नका. त्यांची सेवा करा असे सांगताना पोपट गोसावी यांना ढायमोकळून रडू कोसळलं. यावेळी उपस्थितांचे डोळे देखील पाणावले.

यावेळी मान्यवर, पाहुणे मंडळी व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंत गोसावी, संदिप गोसावी, पत्रकार पंढरीनाथ पुरी, बाबुराव सागर, विनायक गोसावी, सखाराम पुरी, संजय गोसावी, दत्तात्रय गोसावी, राम गोसावी, प्रतिक्षा गोसावी, दिक्षा गोसावी, अभिजित गोसावी, लताबाई पुरी, बाळासाहेब गोसावी, दिलीप गोसावी, निवृत्ती लेंडे, स्वप्निल हासे, जनार्दन गोसावी, प्रदिप गोसावी, वाळुंज सर, सुनिल कदम, प्रियंका जठार, सुरेखा हासे, अश्विनी गोरे, वर्ग चार कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनिल खेडकर यांनी केले तर सुत्रसंचलन अशोक महारनोर आभार पत्रकार किरण पुरी यांनी मानले

Leave a Comment