राहुरी(DSNews24 /कैलास पुरी) गेल्या दोन दिवसांपासून अहिल्या नगर जिल्ह्यातील विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अनेक नद्यांना आणि ओढ्यांना पूर आला आहे.
राहुरी तालुक्यातील मुसळधार पावसामुळे मुळा नदीला पूर आला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच मुळा धरणातून तब्बल २५,००० क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे.
पिंपरी चंडकापूर गावाची मुख्य बाजारपेठ असलेल्या वळण पिंपरी ला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलावरून पाणी झेपावत असताना रहदारीसाठी हा मार्ग बंद झाला आहे. या पुलावरून कुणीही प्रवास करू नये असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच वळण पिंपरी चे पोलीस पाटील सोमनाथ डमाळे पुर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
