संगमनेर (DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील विद्या प्रबोधिनी प्रशालेची विद्यार्थिनी श्रावणी तुषार आमले हिने राहुरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात पाचवा क्रमांक पटकावून शाळेची मान उंचावली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाने विद्या प्रबोधिनी शैक्षणिक संकुलात आनंदाचे वातावरण पसरले असून, आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
श्रावणीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत खेमनर, उपाध्यक्ष शंकरराव पाटील खेमनर, सेक्रेटरी भाऊसाहेब सागर, सर्व संचालक मंडळ, रजिस्ट्रार होळकर सर, प्राचार्य जमादार मॅडम, मुख्याध्यापक घुगरकर सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
श्रावणीच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे हे फळ असून, तिच्या यशाने इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणा मिळाली आहे. विद्या प्रबोधिनी प्रशाला नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देते आणि श्रावणीच्या यशाने या परंपरेला पुन्हा एकदा पाठबळ मिळाले आहे. श्रावणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, तिच्या यशाचा हा प्रवास असाच यशस्वी राहो, अशी अपेक्षा शाळा कुटुंबाने व्यक्त केली आहे.
