भारतामध्ये सकाळची सुरुवात चहाशिवाय पूर्ण होत नाही. ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा दुधाचा चहा. प्रत्येकाला आवडीप्रमाणे चहा हवाच असतो. बरेच लोक सकाळी उठल्यावर ब्रश करून लगेच चहा घेतात. पण हे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी चांगले नाही, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
ब्रश केल्यानंतर चहा का हानिकारक?
संशोधनानुसार, ब्रश केल्यानंतर दातांचा पृष्ठभाग (इनेमल) थोडा मऊ होतो आणि त्या वेळी दात जास्त संवेदनशील असतात. अशावेळी चहातील टॅनिन्स दातांवर चिकटतात आणि त्यामुळे दात पिवळे पडण्याची शक्यता वाढते. याशिवाय फ्लोराइड दातांना संरक्षण देतो, परंतु लगेच चहा प्यायल्याने फ्लोराइडची परत लवकर निघून जाऊ शकते. त्यामुळे दातांचे नैसर्गिक संरक्षण कमी होते.
विशेषत: लिंबूसह घेतलेली चहा किंवा दुधाविना चहा थोडी आम्लीय (अॅसिडिक) असते. त्यामुळे लगेच सेवन केल्यास दातांचा इनेमल आणखी झपाट्याने झिजतो. याला इनेमल इरोजन म्हणतात.
काय करायला हवं?
ब्रश केल्यानंतर किमान 30 ते 60 मिनिटांनी चहा घ्यावा.
लगेच पेय घ्यायचं असल्यास फक्त पाणी प्यावं किंवा तोंड स्वच्छ धुवावं.
कॅल्शियमयुक्त पदार्थ जसे की दूध, ताक किंवा दही यांचे सेवन केल्याने तोंडातील आम्लता कमी होते.
जास्त वेळ रिकाम्या पोटी आम्लीय पेय घेणं टाळावं.
दातांच्या आरोग्यासाठी लहानसहान सवयी महत्त्वाच्या ठरतात. ब्रश केल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय दातांच्या इनेमलला हानी पोहोचवते आणि दात पिवळे पडण्याचा धोका वाढवते. त्यामुळे आता पासून ब्रश आणि चहा यामध्ये थोडं अंतर ठेवणं गरजेचं आहे.
