बिग ब्रेकिंग! आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन 

नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले (वय ६५) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

शिवाजी कर्डीले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिले असून, कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेतकरी वर्गासाठी अनेक योजना राबवल्या होत्या.

नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर या गावातील शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. दूध उत्पादक शेतकरी, गावात सरपंच, आमदार, राज्यमंत्री असा त्यांचा मोठा राजकीय प्रवास राहिला आहे.

 

कोण होते शिवाजीराव कर्डीले?

शिवाजीराव कर्डीले २००९ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून उभे होते. त्यांनी ५७ हजार ३८० मतं मिळवून विजय संपादन केला होता. २०१४ मध्येही ९१ हजार ४५४ मतांनी विजय मिळवला होता.

सुरुवातीला त्यांनी आपला दुधाचा व्यवसाय सुरू केला. काही काळ ते गावचे सरपंच राहिले होते. त्यानंतर अपक्ष म्हणून आमदारकीसाठी उभे राहिले आणि निवडूनही आले. जमिनीचे व्यवहार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योग यामुळे त्यांचे नाव संपूर्ण जिल्ह्याभरात झाले. २०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीमध्ये जाहीर सभा घेतली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागते.

Leave a Comment