धक्कादायक! पठारभागाची बुलंद तोफ हरपली, बुवाजी पा. खेमनर यांचं निधन 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूरच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आलीय. भाजपचे नेते बुवाजी पा. खेमनर यांचं अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचं ४९ वय होतं. पुण्यात जहांगिर हॉस्पिटलमध्ये त्यांनी दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच पठार भागावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 

साकूर पठार भागाची बुलंद तोफ म्हणून बुवाजी पा. खेमनर यांची ओळख होती. तसेच एक आक्रमक भाषण ठोकणारा नेता म्हणून कायमच ते चर्चेत असायचे. समाजकारण, धार्मिक, शैक्षणिक तसेच राजकारणात त्यांचं नावलौकिक होत. बुवाजी पा. खेमनर यांच्या अचानक जाण्याने पठारभागाला धक्का बसला आहे.

साकूर येथील धुपेश्वर तीरावर आज रात्री ९.३० वाजता बुवाजी पा खेमनर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Comment