संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील रणखांब येथे एक भलतीच घटना घडलीय. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने एका शेतकऱ्याच झेंडूच्या फुलांची झाडांचं नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवनाथ पांडुरंग जाधव यांच्या शेतातील झेंडूच्या फुलांच्या झाडांची अज्ञात व्यक्तीने पायाने तुडवून नुकसान केल्याची घटना दि. २१ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडलीय.
अधिक माहिती अशी की, नवनाथ जाधव हे रणखांब येथील रहिवासी आहे. आपल्या कुटुंबासह शेती व्यवसाय करत आहे. त्यांनी गट नं ८४४ या क्षेत्रात झेंडूची शेती केली आहे. जवळपास ५ हजार झेंडुची झाडे लावली आहेत. परंतु २१ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या झेंडूच्या फुलांची झाडेच पायाने तुडवून नुकसान केले आहे. त्यामुळे हा प्रकार कुणी केला? का केला? हाच प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र नवनाथ जाधव यांनी थेट घारगाव पोलिस स्टेशन गाठत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
