संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यात कॉंग्रेस पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात व संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आउटरिच युवक काँग्रेसची संगमनेर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत शिंदोडी येथील लक्ष्मण उत्तम कुदनर यांना स्थान देण्यात आले असून त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकनिष्ठपणाने लक्ष्मण कुदनर यांनी पठार भागात काम केले असल्याने त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नवीन पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर लक्ष्मण कुदनर यांच लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, संगमनेर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिरा शेटे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, रामदास धुळगंड सर, भगवान उद्योग समूहाचे संस्थापक आदिकराव खेमनर, बालाजी उद्योग समूहाचे संस्थापक बाबासाहेब भोसले, चेअरमन रेवजी धुळगंड यांनी अभिनंदन केले.
यावेळी आउट रीच तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ विजय पवार, ॲड. अशोक हजारे, सचिन खेमनर, उत्तम कुदनर, पोपट कुदनर, बाबूलाल शेख, सखाराम कुदनर, दादासाहेब बागुल, संजय खामकर, बाबासाहेब कुदनर, सोपान कुदनर, आप्पासाहेब कुदनर उपस्थित होते.
