बाळासाहेब थोरातांकडून स्व.बुवाजी खेमनर यांच्या कुटुंबीयांच सांत्वन 

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील जांभुळवाडी येथील भाजप नेते, साकूर पठारभागाची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे बुवाजी पा. खेमनर ( वय ४९ ) यांच १७ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान राष्ट्रीय कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्व. बुवाजी पा. खेमनर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं आहे. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्व. बुवाजी पा. खेमनर यांच्या फोटोला पुष्पांजली अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर खेमनर कुटुंबियांची आपुलकीने बाळासाहेब थोरात यांनी विचारपूस करत धीर दिला. तसेच स्व. बुवाजी खेमनर यांचे चिरंजीव संकेत खेमनर यांच्याशी बाळासाहेब थोरात यांनी चर्चा केली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, आदिकराव खेमनर, सुदाम सागर, योगेश खेमनर, बाळासाहेब सागर, महादु कुदनर, बाळु झिटे, सावळेराम खेमनर, नामदेव खेमनर, कोंडाजी कुदनर आदि उपस्थित होते.

Leave a Comment