बाबासाहेब भोसलेंवर दुःखाचा डोंगर, बाळासाहेब थोरातांनी केल सांत्वन

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील बालाजी उद्योग समूहाचे संस्थापक बाबासाहेब भोसले यांचे पुतणे चि.श्रेयस संजय भोसले ( बालु ) याच दिपावली पाडव्याच्या दिवशी दुःखद निधन झाल्याने भोसले कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रेयस याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यादरम्यान राष्ट्रीय कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बालाजी उद्योग समूहाचे संस्थापक बाबासाहेब भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच व कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्व.श्रेयश याच्या फोटोला पुष्पांजली अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर श्रेयशच्या निधनानं भोसले कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळल्याने बाळासाहेब थोरात यांनी भोसले कुटुंबियांना धीर दिला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, चेअरमन रेवजी धुळगंड उपस्थित होते.

Leave a Comment