नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजन पाटील यांनी अजित पवार यांना धक्का दिलाय. भाजपमध्ये जाताच पाटील यांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिलाय. अजित पवार यांच्या पक्षाला घरघर लागल्याचं दिसत आहे. मंत्र्यांवरील आरोपानंतर आता नेत्यांचं आऊटगोइंग, यामुळे अजितदादांची चिंता वाढलीय.
महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या आणि मोठा भाऊ असणाऱ्या भाजपने सोलापूरमध्ये ‘ऑपरेशन लोट्स’ करत अजितदादांना जबर धक्का दिला. हे धक्के कमीच होते की, अजित पवार यांना राजन पाटील यांनी अजून एक धक्का दिला. राजन पाटील यांनी सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय.
माझा राजीनामा स्विकार करावा ही मुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती केल्याचं पाटील यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सहकार परिषदेचे अध्यक्षपद मिळालंय. त्यामुळे मी माझा राजीनामा देत आहे, असं राजन पाटील यांनी राजीनामा दिलाय. दरम्यान राजन पाटील हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षातील एक महत्त्वाचा माजी आमदार भाजपने आपल्याकडे ओढून घेतलाय.
