बच्चू कडूंचा संताप, भर गर्दीत जिल्हाधिकाऱ्यांना झापल

नागपूर – माजी मंत्री बच्चू कडू हे शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूरमध्ये हजारो शेतकऱ्यांसह ते आंदोलन करत आहेत. बुधवारी सायंकाळी न्यायालयाने बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळ सोडण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर बच्चू कडू हे आपल्या सहकाऱ्यांसोबत अटक करून घेण्यासाठी निघाले होते. त्यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी बच्चू कडू यांना भेटायला आले होते. यावेळी कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झापलं आहे.

बच्चू कडू यांनी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलं

नागपूरचे कलेक्टर कडू यांनी भेटले त्यावेळी बच्चू कडू म्हणाले की, ‘तुम्हाला आज वेळ मिळाला का? आम्ही इतके दिवस झाले आंदोलन करत आहोत, आमची एकदा तरी भेट घ्यावी असं तुम्हाला वाटलं नाही का? यावर कलेक्टर म्हणाले मी तुमच्या संपर्कात होतो. यावर कडू म्हणाले की, तुम्ही कुठे संपर्कात होतात? आम्हाला मूर्ख बनवत आहात का? तुम्ही कलेक्टर आहात, कायदा सुव्य़वस्था राखणे तुमची जबाबदारी आहे.’

तुम्ही भाजपच्या कार्यालयातून काम करा…

पुढे बोलताना कडू यांनी, ‘संपूर्ण आंदोलनादरम्यान तुमचा एकही फोन आला नाही. ही तुमची चांगली बाब नाही. तुम्ही स्वत:ला काय समजता? आम्ही इतके दिवस आंदोलनाला बसलो होतो, तुमचा एसपी भाजपचा झेंडा घेऊन फिरत आहे. तुम्ही भाजपच्या कार्यालयातून काम करा’ अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांना झापले आहे. यावेळी मीडियाचे प्रतिनिधी, अनेक प्रमुख शेतकरी नेते आणि हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment