इच्छुक उमेदवारांना झटका, निवडणूकीत उतरण्याआधी “हे” वाचाच…

मुंबई – दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढता येत नाही, असा कायदा असताना अनेक जण दोनपेक्षा जास्त अपत्य लपवण्याची शक्कल लढवतात. असे प्रकार आगामी निवडणुकांमध्ये होऊ नयेत, यासाठी उचित उपाययोजना करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत.

गैरप्रकार टाळण्यासाठी ‘एसओपी’ तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २००१ नंतर जर दोनपेक्षा जास्त अपत्या असतील, तर निवडणूक लढवता येणार नाही.

राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. पाच ते सात वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. ३१ जानेवारी २०२६ च्या आतमध्ये राज्यात निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

Leave a Comment