संगमनेर (DSNewa24/किरण पुरी) नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण सोडत निघाल्यानंतर ज्या त्या प्रभाग, गट व गणात इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रचाराला सुरुवात केली आहे. कोणत्याही क्षणी निवडणूकांचा बार उडणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गुप्त गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तसेच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा तसेच सर्वांचेच संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटाकडे लक्ष लागले असून या गटाचे सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने हा गट राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा बनला आहे. तसेच या गटात जिल्हा परिषदेसाठी विखे आणि थोरात कार्यकर्त्यांची सरळसरळ लढत असून दोन्हींकडूनही विविध नावांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
या चर्चेत युवकांच्या गळ्यातील ताईत, तसेच युवा नेता म्हणून ओळखले जाणारे गुंजाळवाडी पठार येथील किरण बादशहा भागवत यांच नाव आघाडीवर असून त्यांनी थेट जिल्हा परिषदेसाठी दंड थोपटले आहेत. तसेच त्यांनी महायुतीकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या आता वाढू लागल्याने ऐनवेळी कोण उमेदवार द्यावा असा मोठा पेच आता महायुतीसमोर पडण्याची शक्यता आहे.
किरण भागवत यांचा परिचय काय आहे?
किरण भागवत हे गुंजाळवाडी पठार येथील रहिवासी असून त्यांनी अत्यंत कमी वयात राजकीय क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. तसेच ते युवा उद्योजक व सुशिक्षित आहे. सन २००९ साली किरण भागवत यांनी स्व. मधूकरराव पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकारणात सक्रिय झाले. स्व. मधूकरराव पिचड साहेब यांच्या सोबत त्यांनी त्यावेळी एकनिष्ठ पणाने काम केले. त्यामुळे त्यांची एक नवीन ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी २०१७ साली राष्ट्रवादीकडून पिंपळगाव देपा गणातून पंचायत समितीची देखील निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांची संपुर्ण जिल्हा परिषद गटात एक नवखा उमेदवार चर्चा झाली होती.
२०१७ साली किरण भागवत यांनी विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. जनसामान्यांच्या प्रत्येक प्रश्नांसाठी किरण भागवत धावून गेले. तसेच २०१२ ते २०१७ या काळात तत्कालीन आमदार वैभवराव पिचड व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. या काळात किरण भागवत यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला होता. त्यानंतर सन २०१७ ते २०२२ या काळात त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुंजाळवाडी पठार ग्रामपंचायतीवर स्वबळावर एकहाती सत्ता काबीज केली. आजही ग्रामपंचायत महायुतीच्या ताब्यात असून त्यांच्या पत्नी सौ. रोहिणी किरण भागवत सध्या विद्यमान सरपंच आहे. तसेच गेल्या ४० वर्षांपासून कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली गावातील विविध कार्यकारी सोसायटी आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली खेचून आणत सोसायटीवर सत्ता काबीज केली
जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले
आपल्या खास शैलीतून किरण भागवत यांनी सर्व धर्म समभाव राखत सर्व सामान्यांला न्याय देण्याच काम केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कोट्यवधी रूपयांची विकासकामे मंजूर केली आहे. तसेच अडीअडचणीला सर्वसामान्य जनतेसाठी कायमच ते धावून जात आहे.
किरण भागवत यांनी उमेदवारी करावी
सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून साकूर जिल्हा परिषदेसाठी किरण भागवत यांनीच उमेदवारी करावी अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे. तसेच एकनिष्ठ पणाने काम करणारा हा युवा नेता असून मुलभूत प्रश्नांचा मोठा अभ्यास त्यांच्याकडे आहे. २० वर्षांपासून राजकीय क्षेत्रात ते काम करत असून मोठा दांडगा अनुभव त्यांच्या पाठिमागे आहे. त्यामुळे महायुतीने किरण भागवत यांनाच उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी साकूर गटातून होताना दिसत आहे.
