बिग ब्रेकिंग! तर आम्ही शिंदे गटाशी संबंध तोडू… भाजप नेत्याच मोठं वक्तव्य 

भाजप नेते नारायण राणे यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

तसेच त्यांनी यावेळी शिवसेना शिंदे गटाबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे. कोकणात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर बोलताना नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. असं जर झालं तर आम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत संबंध तोडू असं राणे यांनी म्हटलं आहे. राणे यांच्या या विधानामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

Leave a Comment