बिरेवाडीत सोसायटी, दूध संस्थांचा शुभारंभ ; बाळासाहेब थोरातांची ट्रॅक्टरमधून मिरवणूक 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) विधानसभेला जे झालं ते झाल. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत कोणत्याही परिस्थितीत सर्वांची मदत झाली पाहिजे. तसेच सर्वांनी भक्कम उभे राहिले पाहिजे. बुद्धीभेद करणारे तसेच जे विष कालविण्याचा कार्यक्रम करणाऱ्यांना दूर ठेवा. चांगलेच उमेदवार देण्याचा प्रयत्न करू. आता जिल्हा परिषद निवडणुकीची ही एक संधी असून सर्वांनी यासाठी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

ते संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील गजानन सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या नुतन इमारतीच भूमिपूजन व विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुतन इमारतीचा उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी उद्घाटन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या करण्यात आले. सोसायटी व दूध संस्थेच्या वतीने भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे प्रभारी चेअरमन माधवराव कानवडे हे होते. तर व्यासपीठावर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पा. खेमनर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिरा शेटे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर व रामदास धुळगंड सर, माजी संचालक शांताराम कढणे, संगमनेर तालुका असंघटित कामगारचे तालुकाध्यक्ष जयराम ढेरंगे, अमृतवाहिनी बॅंकेचे संचालक श्रीकांत गिरी, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे, जांबुतचे सरपंच सोनाली शेटे, बालाजी उद्योग समूहाचे संस्थापक बाबासाहेब भोसले, भगवान उद्योग समूहाचे संस्थापक आदिकराव खेमनर, शेतकी संघाचे माजी संचालक विठ्ठल भागवत व साहेबराव बारवे, तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात, तालुका सचिव प्रकाश कडलग, सरपंच जिजाबाई सागर, माजी सरपंच निलम ढेंबरे, हिवरगाव पठार सोसायटीचे चेअरमन पांडुरंग वामन, रणखांबचे सरपंच बाबाजी गुळवे, आउटरिच युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष लक्ष्मण कुदनर, कोंडाजी कुदनर, युवा नेते बाळासाहेब सागर, मल्हारी सोन्नर, सचिन खेमनर, माजी सरपंच भाऊसाहेब डोलनर, उत्तर कुदनर, बाबाजी सागर, उपसरपंच सुभाष डोंगरे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं आगमन होताच त्यांच्यावर जेसीबीवरून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच ट्रक्टरमध्ये बसून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी अक्षरशः लेझीमवर ठेका धरला होता. या उद्घाटन कार्यक्रमामुळे कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

यावेळी राजहंस दूध संघाचे माजी संचालक पांडुरंग सागर, सुदाम सागर, सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब ढेंबरे, व्हा. चेअरमन ईश्वर सागर, गजानन दूध संस्थेचे चेअरमन पांडुरंग ढेंबरे, व्हा चेअरमन भाऊसाहेब गळंगे, विठ्ठल सागर, नानासाहेब गळंगे, भागा गळंगे, नवनाथ ढेंबरे, एकनाथ ढेंबरे, मारुती गळंगे, भास्कर सागर, ज्ञानदेव ढेंबरे, सुभाष सागर, जना कोळपे, किसन ढेंबरे, संदिप भोसले, संतोष ढेंबरे, बाबाजी ढेंबरे, प्रल्हाद आंबेकर,किसन शेंडगे, सीमा सागर, पार्वताबाई सागर, नवनाथ सागर, संदिप सागर, निवृत्ती सागर, पंढरीनाथ सागर, बाळासाहेब क्षिरसागर तसेच सर्व संचालक, सेल्समन, कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ गळंगे यांनी केले तर सुत्रसंचलन बाळासाहेब गळंगे यांनी केले तर आभार इश्वर सागर यांनी मानले.

Leave a Comment