ब्रेकिंग! शिंदे गटाचे रणजित ढेरंगे यांचही नाव पिंपळगाव देपा गणातून चर्चेत, वाचा किरण पुरींचा आणखी एक रिपोर्ट…

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांची निवडणूक आयोग घोषणा करू शकते. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच सदस्यपदाच आरक्षण सोडत निघाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून ज्या त्या गटात गणात प्रचाराला सुरुवात केलीय. तसेच मतदारांच्या व होम टू होम गाठीभेटी देखील सुरू केल्या आहे. तसेच संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव देपा गणासाठी सर्वसाधारण आरक्षण निघाले आहे. त्यामुळे या गणातून अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. या गणातून महाविकास आघाडी व महायुतीकडून कोण उमेदवार असणार हे अद्याप निश्चित झाले नसले तरी काही इच्छूक उमेदवारांची नावे चर्चेत यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये महायुतीकडून खंडेरायवाडी – पिंपळगाव देपा गृप ग्रामपंचायतीचे धडाडीचे उपसरपंच तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रणजित सयाजी ढेरंगे यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे. जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम उपसरपंच रणजित ढेरंगे यांनी केले असून ते शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक आहे. तसेच जनतेच्या हितासाठी त्यांनी अनेक आंदोलने देखील केले. तसेच ते सर्वसामान्यांत मिळून मिसळून राहणारे नेतृत्व असून त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी आता पिंपळगाव देपा गणातील गावांमधून होताना दिसत आहे.

उपसरपंच रणजित ढेरंगे यांचे वडील एकनिष्ठ शिवसैनिक 

उपसरपंच रणजित ढेरंगे यांची राजकीय पार्श्वभूमी बघितली तर त्यांचे वडील सयाजी पंढरीनाथ ढेरंगे हे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या रक्तातच शिवसेना भिनलेली आहे. पठार भागात त्यांची एक खास ओळख आहे. त्यांचे आणि पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. सयाजी ढेरंगे यांनी शिवसेनेचे एकनिष्ठपणाने काम केले आहे. त्यांनी साकूर पठार भागात १९८४ साली खंडेरायवाडी गावात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती. त्यामुळे त्यांची एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. तसेच ते खंडेरावाडी – पिंपळगाव गाव ग्रृप ग्रामपंचायतीचे काही काळ सदस्य देखील होते.

वडिलांचे विचार धरूनच रणजित ढेरंगे राजकारणात

उपसरपंच रणजित ढेरंगे यांनी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे वडिल सयाजी ढेरंगे यांच्या विचारानुसार राजकारणात सक्रिय झाले. रणजित ढेरंगे यांनी वडिलांच कार्य अगदी जवळून बघितले होते. वडिल जसे शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून राहिले तसेच रणजित ढेरंगे देखील आजही शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे या ढेरंगे कुटुंबीयांची पठार भागात मोठी ओळख निर्माण झाली आहे. तसेच रणजित ढेरंगे सन २०१४ साली माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, किशोर डोके यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात सक्रिय झाले

रणजित ढेरंगे यांची बिनविरोध निवड 

खंडेरायवाडी – पिंपळगाव देपा गृप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रणजित ढेरंगे यांची महत्वपूर्ण निर्णयाक भूमिका ठरली होती. आपल्या कामातून गावात देखील छाप पाडणाऱ्या रणजित ढेरंगे यांच्याविरोधात निवडणूकीत विरोधकांनी उमेदवार न देता त्यांची प्रभाग क्रमांक ४ मधून सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानंतर उपसरपंचपदी देखील त्यांची वर्णी लागली आहे.

शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी 

रणजित ढेरंगे यांनी शिवसेनेशी एकनिष्ठ पणाने केलेले कामाची दखल अक्षरशः शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. एक लढवय्या शिवसैनिक म्हणून रणजित ढेरंगे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी कायमच धावून गेले. याचीच दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसरपंच रणजित ढेरंगे यांच्यावर अहिल्या नगरच्या उपजिल्हाप्रमुख पदाची मोठी जबाबदारी सोपवली.

रणजित ढेरंगे यांनी विधानसभेत दाखवली ताकद 

दरम्यान विधानसभा निवडणुकीत खंडेरायवाडी, पिंपळगाव देपा, मोधळवाडी ही गावे अकोले मतदारसंघात येतात. त्यामुळे या गावांमधील मतदान अकोले विधानसभा मतदारसंघात होत असते. मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांना खंडेरायवाडी, पिंपळगाव देपा, मोधळवाडी या गावांमधून मतदानाचे मोठं लीड देण्यात आले होते. यासाठी उपसरपंच रणजित ढेरंगे यांनी मुख्य भूमिका बजावून मोठी

ताकद लावली होती.

गावच्या विकासासाठी रणजित ढेरंगे कायमच पुढे

राजकारणाबरोबर रणजित ढेरंगे गावच्या विकासासाठी कधीच मागे हटले नाहीत. राजकारण बाजूला सारत गावासाठी विकासनिधी कसा आणता येईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपसरपंच रणजित ढेरंगे यांनी आणला. तसेच विकासकामे मार्गी लावले. त्यामुळे रणजित ढेरंगे गावच्या विकासासाठी कायमच पुढे आहे.

जनतेसाठी रणजित ढेरंगे आंदोलनही केले

नुसतच राजकारण न करता रणजित ढेरंगे यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटत नसेल तर वेळेला आंदोलन देखील केल्याचे पठारभागाने बघितले आहे. यामध्ये टोलनाका, चारा छावणी, वीज आंदोलन व संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर आंदोलन केले होते. ही सर्व आंदोलनाची चर्चा संपुर्ण तालुक्यात बघायला मिळाली होती. त्यामुळे रणजित ढेरंगे यांची चांगलीच ओळख निर्माण झाली आहे.

पिंपळगाव देपा गणात मित्र व नातेवाईकांचा मोठा परिवार 

पिंपळगाव देपा गणातील कर्जुले पठार, डोळासणे, गुंजाळवाडी पठार, खरशिंदे, कुंभारवाडी, कौठेमलकापूर, रणखांब, मांडवे बुद्रुक, मोधळवाडी या गावांमध्ये उपसरपंच रणजित ढेरंगे यांचा मोठा जनसंपर्क असून मित्र, नातेवाईकांचा मोठा परिवार आहे. तसेच रणजित ढेरंगे हे चांगलेच परिचित देखील आहे. त्यामुळे रणजित ढेरंगे यांनाच महायुतीकडून उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी मित्र, नातेवाईक तसेच सर्वसामान्य जनता करत आहे.

Leave a Comment