मोठी बातमी! गॅस सिलिंडर एवढ्या रूपयांनी स्वस्त 

मुंबई – एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत. देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा कमी केल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आल्या आहेत.

घरगुती सिलिंडरच्या किंमती जैसे थे आहेत, दरांमध्ये कोणतीही वाढ अथवा कपात करण्यात आलेली नाही. राजधानी दिल्लीमध्ये १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅसची किंमत १५८०.५० रूपये इतकी झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात येत आहे. एक डिसेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये १० रूपयांची कपात करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात एलपीजी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये पाच रूपये कपात करण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये किमतीत १५.५० रूपयांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्याआधी सिलिंडरच्या किमती सातत्याने कमी होत होत्या. सरकारी मालकीच्या पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्या (आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल) दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात.

IOC च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १० रुपयांनी कमी करण्यात आली. आता दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५८०.५० रुपये आहे. नोव्हेंबर महिन्यात सिलिंडरची किंमत १५९०.५० रुपये होती. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत अद्याप ८५३ रुपये इतकी आहे.

मुंबई-पुण्यात गॅस सिलिंडरच्या किंमती किती ?

मुंबई आणि पुण्यामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १,५३१.५० रुपये इतकी झाली आहे. कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत १,६८४.०० रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये ते १,७३९.५० रुपये इतकी झाली आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमतीत कोणताही बदल झाला नाही. घरगुती सिलिंडरची किंमत ८ एप्रिल रोजी शेवटची बदलण्यात आली होती. मुंबईत ८५२.५० रुपये, दिल्लीमध्ये ८५३ रुपये, कोलकातामध्ये ८७९ रुपये आणि चेन्नईमध्ये ८६८.५० रुपये इतकी किंमत आहे.

Leave a Comment