मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील.
वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कर्क : धार्मिक कार्यात सहभाग होईल. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : वाहने जपून चालवावीत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
धनू : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील.
मकर : जिद्दीने कार्यरत राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कुंभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.
मीन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.
