मतमोजणी २१ डिसेंबरला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई – मतमोजणी 21 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावा लागेल. मला मतदान पद्धती काही योग्य वाटत नाही. चूक नसताना उमेदवारांचा भ्रमनिरास होतोय.

निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधार आणावा. पुढच्या निवडणुकांमध्ये असं होवू नये, हे निवडणूक आयोगाने पाहावं, अशी भूमिकाही देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणुका पुढे नेणं कुठल्याच तत्वात बसत नाही. हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे. माझी पर्सनल नाराजी कायदेशीर मुद्द्यांवर आहे. प्रक्रिया कायदेशीररित्या होत नाही म्हणून माझी नाराजी आहे. केवळ 24 ठिकाणच्या निवडणुकांसाठी सगळी मतमोजणी पुढे करणं योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.

Leave a Comment