…तर पुन्हा आरक्षण सोडत? जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी, महत्वाची अपडेट समोर 

राज्यात अखेरच्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, असे सांगण्यात येत आहे. राज्यातील २० जिल्हा परिषदेतील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत होण्याची शक्यता आहे. २१ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावर सुनावणी होणार आहे.

त्यानंतरच निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असे एका खात्रीलायक सूत्राने सांगितले आहे.

Leave a Comment