राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला निकाल समोर आला आहे. यामध्ये अजित पवारांच्या शिलेदाराने बाजी मारली आहे. वडगावच्या मावळ नगरपंचायतीमध्ये हा पहिला निकाल लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे या निवडून आल्या आहेत. त्या नगरसेवक पदाच्या उमेदवार होत्या. अवघ्या एका मताने त्यांनी निवडणूक जिंकली आहे.
सुनीता ढोरे या प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांना एकूण ३२३ मतं मिळाली. त्यांनी भाजपच्या पूजा अतिश ढोरे यांना एक मताने हरवलं आहे. सुनिता ढोरे यांनी अवघ्या एका मताने निवडणूक जिंकत सर्वांनाच धक्का दिला आहे.
