राहाता नगरपरिषदेवर कुणाचा झेंडा फडकला, मोठी अपडेट समोर….

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता नगरपरिषदेवरील आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आज जाहीर झालेल्या निकालात भाजप-शिवसेना युतीने २० पैकी तब्बल १९ जागा जिंकून विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे स्वाधीन गाडेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान पटकावला आहे.

विरोधकांसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे, कारण राहाता नगरपालिका शहर विकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या आघाडीचे उमेदवार शशिकांत लोळगे हे एकमेव उमेदवार विजय मिळवू शकले. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या एकतर्फी विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत असून, राहाता शहराच्या सत्तेवर आता पूर्णपणे ‘कमळ’ आणि ‘धनुष्यबाण’ यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

Leave a Comment