कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले तीन निकाल समोर आले आहेत. पन्हाळा नगर परिषदेमध्ये जनसुराज्यचे 2, तर भाजपचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत, तर एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. धक्कादायक म्हणजे अपक्ष उमेदवाराने जनसुराज्य पक्षाच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का दिला आहे.
पन्हाळा येथील माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल यांचे पती आणि जनसुराज्य पक्षाचे उमेदवार रवींद्र धडेल यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. अवघ्या 6 मतांनी त्यांना पराभवाची धूळ चारण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार महेश भाडेकर विजयी झाले आहेत.
