आदर्श शिक्षिका स्वाती होले यांना सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित

दौंड(DSNews24) तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी येथील आदर्श व उपक्रमशील शिक्षिका सौ. स्वाती संदिप होले यांना सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्काराने गौरविण्यात आले.

रणरागिणी फाउंडेशन अहिल्यानगर, आनंद आधार फाउंडेशन पुणे आणि समृद्धी प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानज्योती संमेलनात त्यांना हा पुरस्कार अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममताताई सपकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील अनेक सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी हजेरी लावली होती.

सौ. स्वाती होले यांच्या कार्याचे कौतुक नेहमीच या परिसरात होते. यावेळीही त्यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment