भाजपने ऐन महापालिका निवडणुकीच्या काळात एक मोठा निर्णय घेतला असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणे तसेच महायुतीच्या उमेदवारांना सहकार्य न करणे, या कारणास्तव तब्बल २६ जणांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अनेक माजी नगरसेवकांचा आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपकडून मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे आदेश मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी जारी केले आहेत. बंडखोर उमेदवार पदाधिकाऱ्यांना पुढील ६ वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात मोठा गोंधळ उडाला होता. अनेकांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुकांनी बंडखोरी केली. मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वाधिक बंडखोरी भाजपात झाली असल्याचे समोर आले आहे. नाराजांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही बंडखोरी कायम ठेवण्यात आली.
कारवाई करण्यात आलेल्या बंडखोरांची नावे
दिव्या ढोले (प्रभाग ६०, वर्सोवा)
नेहाळ अमर शाह (प्रभाग १७७, माटुंगा)
जान्हवी राणे (प्रभाग २०५, अभ्युदयनगर)
असावरी पाटील (प्रभाग २, बोरिवली – सध्या शिवसेना UBT कडून निवडणूक लढवत आहेत)
मोहन आंबेकर (प्रभाग १६६, कुर्ला)
धनश्री बगेल (प्रभाग १३१, पंतनगर)
प्रशांत ठाकूर, जयमुर्गन नाडर, दिवेश यादव, विनित सिंग, अयोध्या पाठक, सरबजीत सिंग संधू, सुचित्रा संदीप जाधव, अमित शेलार, राकेश कोहेलो
