विद्याप्रबोधिनी प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ; मेजर गौरव देवगिरेकडून झेंडावंदन

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील विद्या प्रबोधिनी प्रशालेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साह व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत अशोकराव पा. खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यालयाचा देशसेवेत कार्यरत असलेला विद्यार्थी विद्यालयात झेंडावंदन करतो. या परंपरेनुसार यावर्षी भारतीय सैन्यात गलवान येथे कार्यरत असलेले माजी विद्यार्थी कु. गौरव संजय देवगिरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी मेजर गौरव देवगिरे यांच्यासह आई-वडिलांचा शाळेतर्फे सन्मान करण्यात आला.

दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत ‘रंगोत्सव’ चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेली विविध विषयांवरील उत्कृष्ट चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती. या चित्र प्रदर्शनाला ग्रामस्थ, पालक आणि कला रसिकांनी मोठ्या संख्येने भेटी दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. तसेच प्रदर्शनातील सुमारे १५ उत्कृष्ट चित्रे उपस्थित कला रसिकांनी खरेदी केली. विशेषत; कला रसिकांनी या चित्रांना उत्कृष्ट दाद दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच शाळेच्या या देशभक्तीपूर्ण आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, कला आणि सर्जनशीलतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली. यावेळी शासकीय रेखांकन स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या घुगरकर अनुपमा सुभाष, तहुरा मोहसिन मोमिन, श्रुतिका दत्तात्रय रंधे, सायमा नाजीम राजे, समृद्धी श्रीकांत लोंढे, प्रिया दादाभाऊ ठाणगे, कार्तिकी श्याम कल्याणकर, आराध्या पंकज भागवत, स्वतिका राहुल तिरवाडी या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

तसेच रंगोत्व स्पर्धेतील लहान गटात स्वामिनी सतिष टेकुडे, सफा झुबेर शेख, श्रेयसी शरद मुंजाळ तसेच मोठ्या गटात श्रुतिका दत्तात्रय रंधे, टहुरा मोहसिन मोमिन, अनुपमा सुभाष घुगरकर या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या रंगोत्वामध्ये स्पर्धेसाठी कु.अक्षय निवृत्ती डोके यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच निवृत्ती डोके व नितीन लोळगे यांनी या रंगोत्वाचे परीक्षण केले. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह ज्ञानदेव डोके यांच्या सौजन्याने देण्यात आले. विद्यालयाच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला.

विद्या प्रबोधिनी प्रशालेत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह संचारला आहे. तसेच उत्कृष्ट विद्यार्थ्यांचे उपस्थितांनी यावेळी कौतुक केले.

Leave a Comment